पुणे - पिंपरी-चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी फुले उधळली तसेच गुलाब पुष्प देऊन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शहरातील पोलीस दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांनी पोलिसांना प्रोत्साहन दिल्याने त्यांनादेखील काम करत असताना ऊर्जा मिळते.
पोलिसांवर नागरिकांनी उधळली फुले; पुष्प देऊन महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान - पुणे कोरोना न्यूज
भोसरीच्या आळंदी रोड येथील संभाजी नगरमध्ये भोसरी पोलीस गस्त घालत होते. तेव्हा, तेथील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करत त्यांना प्रोत्साहन दिले. नागरिकांनी टाळ्या ही वाजवत त्यांचे स्वागत केले, तर महिला पोलीस कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावत आहेत. काही ठिकाणी 'वंदे मातरम'च्या जयघोष केला जातो, तर काही ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचा विजय असो अशा घोषणा दिल्या जात आहेत. भोसरीच्या आळंदी रोड येथील संभाजी नगरमध्ये भोसरी पोलीस गस्त घालत होते. तेव्हा, तेथील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करत त्यांना प्रोत्साहन दिले. नागरिकांनी टाळ्या ही वाजवत त्यांचे स्वागत केले, तर महिला पोलीस कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवडे, पोलीस कर्मचारी बबन मोरे आदी उपस्थित होते. नागरिक पोलिसांना प्रोत्साहन देत असल्याने त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळते. दरम्यान, अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचे कुटुंबीयांना मूळ गावी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना नागरिकांच्या प्रेमाची अत्यंत गरज आहे. अशा वेळी नागरिक त्यांना फुलांची उधळण करून मायेची ऊब देत आहेत हे नक्की.