पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात मध्यरात्रीपासून शाळा, चित्रपटगृह, जिम, जलतरण तलाव, मॉल्स, शाळा आदी बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकजण कोरोना विषाणूमुळे भयभीत असून त्यांनी गावी जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. यामुळे खासगी बसला काल रात्रीपासून गर्दी झाली असून बस प्रावासाचे भाडे देखील वाढले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योग नगरी म्हणून ओळखले जाते. शहरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कष्टकरी नागरिकांची मोठी संख्या आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या भीतीपोटी नागरिकांनी गावाकडली वाट धरली आहे. शहरात तीन जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यातच शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाची ठिकाणे, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे ज्यांच्या मनात कोरोनाविषयी धास्ती होती. त्यांनी थेट गावाकडे जाणे पसंद केले आहे.