पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या आवाहनाला पुण्यातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. कोथरूड येथील गांधी भवन येथे रविवारी आठवडी बाजार भरविण्यात आले होता. या आठवडी बाजारात सोशल डिस्टन्सिंग पाळत नागरिकांनी भाजीपाला खरेदी केला आहे.
पुण्यात सोशल डिस्टन्सिंगमध्ये पार पडला आठवडी बाजार - पुणे
बाजाराचे शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यात आले होत. नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आत जात होते. सर्व काही बंद असताना आठवडे बाजार सुरू केल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत पुण्यातील मुख्य बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील सहकारी संस्थेचे उप निबंधक दिग्विजय राठोड व विनायक सहकारी गृह रचना संस्थेने गांधी भवन येथे आठवडी बाजार भरविले होते. बाजाराचे शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यात आले होत. नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आत जात होते. सर्व काही बंद असताना आठवडी बाजार सुरू केल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा-माणुसकी! चालक आणि कंडक्टरच्या मदतीमुळे वाचले गरोदर महिलेचे प्राण