पुणे - शहरात आजपासून (मंगळवार) 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा ,दूध आणि मेडिकल वगळता इतर सर्व बंद राहणार आहे. मात्र, असे असतानाही शहरात आज सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
पुणे लॉकडाऊन; मात्र, रस्त्यांवर पुन्हा उसळली गर्दी
नागरिक गाड्या बाहेर काढून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटलसमोरील चौकात तर गाड्यांची रांग लागल्याचे चित्र होते. त्यामुळे आजपासून लॉकडाऊन आहे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली की नाही? हा प्रश्न यानिमित्ताने विचारला जाऊ लागला.
नागरिक गाड्या बाहेर काढून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटलसमोरील चौकात तर गाड्यांची रांग लागल्याचे चित्र होते. त्यामुळे आजपासून लॉकडाऊन आहे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली की नाही? हा प्रश्न यानिमित्ताने विचारला जाऊ लागला.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन लागू होणार हे आधीच जाहीर करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर काल (सोमवारी) सायंकाळी सांगवी आणि देहूरोड पोलिसांनी कंबर कसत रूटमार्च काढत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. पोलिसांचा फौजफाटा शिस्तीत चालत नागरिकांना उद्यापासून बाहेर न पडण्याचे ध्वनिक्षेपनाद्वारे आवाहन करत होता. मध्यरात्रीपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात संचार बंदी लागू होणार आहे. खासगी वाहनास बंदी असणार आहे. हे नियम मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत लागू असतील, अशी माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली होती.
लॉकडाऊनच्या या कालावधीत शहरातील सर्व किराणा दुकान, किरकोळ व ठोक विक्रेते, व्यापारी दुकाने हे दिनांक मध्यरात्रीपासून पर्यंत पूर्णतः बंद राहतील. त्यानंतर 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व दुकाने व अस्थापने बंद राहतील. मार्च महिन्यापासून पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत.