महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात भाजप व शिवसेनेच्या विरुद्ध जनतेचा मोठा क्रोध : दिलीप वळसे-पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज (गुरुवारी) आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आघाडीचे चित्र स्पष्ट आहे. राज्यात भाजपा व शिवसेनेच्या विरुद्ध जनतेचा मोठा क्रोध आहे. म्हणून मतदार आघाडीच्या बाजुनेच कौल देतील आणि आणि आघाडीमधील उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील, असे ते म्हणाले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी दिलीप-वळसे पाटील यांचे औक्षण करण्यात आले.

By

Published : Oct 3, 2019, 12:32 PM IST

पुणे - आघाडीचे चित्र स्पष्ट आहे. राज्यात भाजप व शिवसेनेच्या विरुद्ध जनतेचा मोठा क्रोध आहे. म्हणून मतदार आघाडीच्या बाजुनेच कौल देणार आहे, असा विश्वास विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला वाढता विरोध, भूमिपुत्रालाच संधी देण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज (गुरुवारी) आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आघाडीचे चित्र स्पष्ट आहे. राज्यात भाजप व शिवसेनेच्या विरुद्ध जनतेचा मोठा क्रोध आहे. म्हणून मतदार आघाडीच्या बाजुनेच कौल देतील आणि आणि आघाडीमधील उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील.

हेही वाचा -दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंना ठेंगा; पत्ता कापल्याचे निश्चित?

वळसे-पाटील आज (गुरुवारी) सकाळी घरातून औक्षण करून बाहेर पडले. मंचर शहरात त्यांची वाजत गाजत रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीनंतर ते जाहीर सभा घेणार आहेत. यानंतर घोडेगाव या ठिकाणी जाऊन ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details