महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंबेगावातील धामणी खिंडीत विजेच्या तारेत अडकून मोराचा मृत्यू - मोरांचे वास्तव्य

आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे ज्ञानराज मंदिराजवळ असणाऱ्या खिंडीत विद्युत खांबाच्या तारेला चिकटून मोराचा मृत्यू झाला. मोर झेप घेत असताना विद्युत वाहक तारांना चिकटला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला.

आंबेगावातील धामणी खिंडीत विद्युत वाहक तारेला चिकटून मोराचा मृत्यू

By

Published : Aug 21, 2019, 6:23 PM IST

पुणे -आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे ज्ञानराज मंदिराजवळ असणाऱ्या खिंडीत विद्युत खांबाच्या तारेला चिकटून मोराचा मृत्यू झाला. आज (बुधवार) सकाळी ही घटना घडली.

आंबेगावातील धामणी खिंडीत विद्युत वाहक तारेला चिकटून मोराचा मृत्यू
मागील अनेक वर्षांपासून धामणी खिंड परिसरात मोरांचे वास्तव्य आहे. मोर झेप घेत असताना विद्युत वाहक तारांना चिकटला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. देशाचा राष्ट्रीय पक्षी असणारे मोर गेल्या अनेक दिवसांपासून अन्नपाण्याच्या शोधात लोकवस्तीत येतात. मात्र सध्या मोरांचे लोकवस्तीतील वास्तव्य धोक्यात येत आहे. वारंवार अशा अपघाताच्या घटना घडत आहेत, याकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details