महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडकरांना सोमवारपासून एक दिवसाआड पाणी; आयुक्तांची घोषणा - पिंपरी-चिंचवडकरांना सोमवारपासून दिवसाआड पाणी

पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याची घोषणा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली आहे. येत्या सोमवारपासून (25 नोव्हेंबर) पाणीपुरवठाबाबत नविन नियमावली लागू केली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 99 टक्के पाणीपुरवठा असताना पाणी कपातीची कुऱ्हाड नागरिकांवर उगारली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. मात्र आयुक्तांनी शहराच्या भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर

By

Published : Nov 19, 2019, 8:27 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याची घोषणा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली आहे. येत्या सोमवारपासून (25 नोव्हेंबर) पाणीपुरवठाबाबत नविन नियमावली लागू केली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 99 टक्के पाणीपुरवठा असताना पाणी कपातीची कुऱ्हाड नागरिकांवर उगारली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. मात्र आयुक्तांनी शहराच्या भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा - दिवे घाटामध्ये दिंडीत घुसला जेसीबी; संत नामदेव महाराजांच्या वंशजासह एक वारकरी ठार

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धारणक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण हे तुडुंब भरले असताना पाणी कपात केली जात आहे. दिनांक 25 नोव्हेंबर पासून शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहराची लोकसंख्याचे कारण देत ही कपात केल्याची सांगितले आहे. सध्या शहराची लोकसंख्या 27 लाख आहे. त्यानुसार पाणीपुरवठा केल्यास पाण्याची टंचाई भासू शकते अस आयुक्त म्हणाले. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप व्हावे यासाठी दिवसाआड पाणी पुरवठा याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आयुक्त म्हणाले, दिवसाआड पाणीपुरवठा हे दोन महिण्याकरिता लागू असणार असून त्यामध्ये सुधारणा न झाल्यास संबंधित पाणीपुरवठा विभागाला जबाबदार धरले जाईल. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात पाणी कमी दाबाने येत असल्याची ओरड नागरिकांमध्ये आहे. आता त्यात दिवसाआड पाणी पुरवठा झाल्याने आणखी भर पडली आहे. शहराला दिवसाला 500 एमएलडी (प्रत्येक दिवसाला मिलीयन मध्ये लागणारे पाणी) पाणी लागते. तर अधिकृत नळजोडणी ही 1 लाख आहे. हे सर्व पाहता 38 ते 40 टक्के पाण्याची तूट होते. ते भरून काढण्यासाठी दिवसाला किमान 600 एमएलडी पाणी द्यावे लागेल असे आयुक्त म्हणाले.

हेही वाचा - पाहा ट्रेलर : 'हर एक मराठा में छुपा है एक लाख मराठा' : 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर'

ABOUT THE AUTHOR

...view details