महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड पाणीपुरवठा करणारे पवना धारण ओव्हरफ्लो; ७६०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग - पवना नदी

पवना धरण ओव्हर फ्लो झाल्याने धरणाचे दरवाजे दीड फूट उघडून त्यामधून ७६७२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच पवना नदीच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पवना धरण ओव्हर फ्लो झाल्याने पवना नदीच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

By

Published : Aug 3, 2019, 11:15 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. सध्या धरण ओव्हर फ्लो झाल्याने धरणाचे दरवाजे दीड फूट उघडून त्यामधून ७६७२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदीच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पवना धरण ओव्हर फ्लो झाल्याने पवना नदीच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पहाटे सहा वाजता जल विद्युतद्वारे १२०० क्यूसेक विसर्ग करण्यात आला. तर साडेबारा वाजता ५६०० क्यूसेक विसर्ग करण्यात आला. मात्र, दुपारनंतर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला असून पवना धरण हे ९८ टक्के भरले आहे. त्यामुळे रात्री नऊ वाजल्या नंतर एक फुटांवरून दीड फूट सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामधून ७६७२ येवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

दरवर्षी नदी काठच्या झोपडपट्टी आणि वस्त्यात पाणी शिरते ही वस्तुस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना नदीपात्र दुथडी भरुन वाहत आहे. पवना धरणातून विसर्ग सुरू आहे. येत्या काळात आणखी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details