पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहराची तहान भागविणारे पवना धरण हे 95 टक्के भरले असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण लवकरच शंभर टक्के भरले जाईल. धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे पवना नदी काठावरील गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक शेटे यांनी केले आहे.
पिंपरीकरांना पाणी पुरवठा करणारे पवना धरण 95 टक्के भरले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - पुणे जिल्हा बातमी
पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणारे पवना धरण हे 95 टक्के भरले असून पाऊस सुरूच राहिल्यास लवकरच शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. सांडव्यातून नदी पात्रात पाणी सोडले जाणार असल्याने पवना नदी काठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.
धरण
Last Updated : Aug 29, 2020, 10:19 PM IST