महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अखेर तो नरभक्षक बिबट्या जेरबंद; तब्बल १५ दिवसानंतर वनविभागाला यश - forrest department trap bibtya

या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये या बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केली होती. तर एका दीड वर्षाच्या लहान मुलीलाही या बिबट्याने ठार केले होते. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. त्यामुळे या बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्याचे मोठे आव्हान विभागापुढे होते.

...अखेर तो नरभक्षक बिबट्या जेरबंद; तब्बल १५ दिवसानंतर वनविभागाला यश

By

Published : Nov 17, 2019, 9:37 AM IST

Updated : Nov 17, 2019, 9:43 AM IST

पुणे- गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर तालुक्यातील जांबुत परिसरामध्ये एका नरभक्षी बिबट्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या बिबट्याला पकडण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे होते, अखेर आज पहाटे या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

...अखेर तो नरभक्षक बिबट्या जेरबंद; तब्बल १५ दिवसानंतर वनविभागाला यश
या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये या बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केली होती. तर एका दीड वर्षाच्या लहान मुलीलाही या बिबट्याने ठार केले होते. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. त्यामुळे या बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्याचे मोठे आव्हान विभागापुढे होते.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून वनविभागाचे कर्मचारी दिवस-रात्र या परिसरात आठ पिंजरे लावून गस्त घालत होते.अखेर आज पहाटे या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. बिबट्याला पकडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. हा बिबट्या अंदाजे दहा ते बारा वर्षे वयाचा असून नर जातीचा आहे.

Last Updated : Nov 17, 2019, 9:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details