पुणे - बारामती तालुक्यातील मेखळी परिसरात गुरुवारी (17 डिसेंबर) रोजी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. संबंधित मृतदेह स्थानिक नागरिकाचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास बरकडेवस्ती येथील स्मशानभूमीत अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक निरीक्षक योगेश लंगुटे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तसेच पंचनामा केला.
बारामतीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटली... दारूच्या नशेत स्वत:ला पेटवले
बारामती तालुक्यातील मेखळी परिसरात गुरुवारी (17 डिसेंबर) रोजी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. संबंधित मृतदेह स्थानिक नागरिकाचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंच्या आधारे ती व्यक्ती ऊसतोड मजूर असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. मात्र हा मृतदेह मेखळी गावातील स्थानिक दादासो पांडुरंग भिसे (वय 46) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते पहाटे पाचच्या सुमारास घरातून बाहेर पडल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.
दारूच्या नशेत स्वतःला पेटवले
दारूच्या नशेत भिसे यांनी स्वतःला पेटवून घेतले. नाका-तोंडात धूर गेल्यामुळे त्यांना आरडा-ओरडा करता आला नाही आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार गुरुवारी रोजी पहाटे घडला. मृतदेहाशेजारी सापडलेले मफलर, बाटली, काडीपेटी इत्यादी वस्तू त्यांच्या घरातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत अधिक माहिती बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.