पुणे - मावळ लोकसंभा मतदारसंघात प्रचारादरम्यान पार्थ पवार भजनात चांगलेच रमलेले पाहायला मिळाले. आज खालापूर तालुक्यात प्रचारदौरा सुरू असताना नावंडे गावात गणपती मंदिरात भजन सुरू होते. त्यावेळी पार्थ त्याठिकाणी असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते.
...अन् पार्थ पवार भजनात रमतात तेव्हा - पुणे
आघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी तसेच जाहीर झाल्यानंतर प्रचार करताना देखील चांगलेच चर्चेत आले आहेत. काही वेळा सोशल मीडियावर ट्रोलदेखील झाले आहेत. आजही मंदिरात भजन सुरू असल्याचे पाहताच पार्थ पवार त्या मंदिरात गेले. त्
![...अन् पार्थ पवार भजनात रमतात तेव्हा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2918934-thumbnail-3x2-parth.jpg)
भजनात रमलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार
भजनात रमलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार
आघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी तसेच जाहीर झाल्यानंतर प्रचार करताना देखील चांगलेच चर्चेत आले आहेत. काही वेळा सोशल मीडियावर ट्रोलदेखील झाले आहेत. आजही मंदिरात भजन सुरू असल्याचे पाहताच पार्थ पवार त्या मंदिरात गेले. त्यांनी टाळ हातात घेत भजनाचा आनंद घेतला. पार्थ हे भजनात रमल्याचे पाहताच उपस्थित असणारे सर्वच लोक आश्चर्यचकीत झाले.