पुणे - फक्त एका निवडणुकीसाठी नाही तर, मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली आहे. मावळमधील मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल व सर्वांनी केलेल्या कठोर परिश्रमाबद्दल पार्थ पवार यांनी आभार मानले.
एका निवडणुकीसाठी नाही तर, सदैव लोकांसाठी कार्यरत राहणार - पार्थ पवार
फक्त एका निवडणुकीसाठी नाही तर, मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली आहे
पार्थ पवार
पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी तब्बल २ लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. पार्थ पवार यांचा पराभव हा पवार घराण्यातील पहिला पराभव आहे. या मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. राष्ट्रवादीसह, काँग्रेस आणि शेकापनेही आपली ताकद पणाला लावली होती. मात्र, मतदारांनी पुन्हा श्रीरंग बारणेंनाच कौल दिला.