महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' बाळांना निर्दयीपणे उघड्यावर टाकणाऱ्या मातापित्यांचा लागला शोध - Pashan talav

पुण्यातील पाषाण तलावाजवळ 14 जानेवारी रोजी दोन नवजात बालके आढळली होती. त्यांच्या मातापित्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

सापडलेले बाळ
सापडलेले बाळ

By

Published : Jan 21, 2020, 9:18 PM IST

Updated : Jan 21, 2020, 9:54 PM IST

पुणे- पुण्यातील पाषाण तलाव परिसरात दोन दिवसांच्या दोघा बाळांना उघड्यावर टाकून पसार झालेल्या निर्दयी मातापित्यांना पोलिसांनी अखेर अटक केली. दोघेही पुण्यातील वडगाव धायरी परिसरातील रहिवाशी आहेत. या बाळांची आई विधवा असून तिला यापूर्वी तीन मुली आहेत. सध्या ती एका तरुणासोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होती. त्यातून या बाळांचा जन्म झाला होता.

'त्या' बाळांचे निर्दयी मातापित्यांचा लागला शोध

पुण्यातील पाषाण तलावाजवळ 14 जानेवारी रोजी दोन नवजात अर्भके सापडली होती. निर्दयी मातापित्यांनी ब्लँकेटमध्ये गुंडाळून या दोघांना तलावाशेजारी ठेवले होते. थंडीने कुडकुडणारी ही बाळं भुकेने व्याकूळ झाल्याने रडत होती.

सकाळी मॉर्निंग वॉक करताना नागरिकांना रडण्याचा आवाज आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर नागरिकांनी ही पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोघांचीही तब्येत आता व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - पुणे : वाघोली येथील तलावात आई-मुलासह तिघांचा बुडून मृत्यू

Last Updated : Jan 21, 2020, 9:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details