पिंपरी-चिंचवड -शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेचे मी स्वागत करते असं यावेळी मुंडे यांनी म्हटले आहे. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजपा आणि शिवसेनेची अनेक वर्षांपासून युती राहिलेली आहे. युतीमुळे अनेकांना संधी मिळाली. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिणे साहाजिक आहे. प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेचे मी स्वागत करते, भविष्यातील निर्णय त्या-त्यावेळी घेतले जातील.