पुणे- शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या वस्तू संग्रहाला 10 जानेवारी 2020 ला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिवंगत डॉ. दिनकर केळकर यांची 125 वी जयंती आणि वस्तुसंग्रहालयास काल (दि. 10 जाने.) शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त प्रख्यात बासरी वादक दिवंगत पंडित पन्नालाल घोष यांच्या बासऱ्यांचा संग्रह केळकर संग्रहालयाला प्रदान करण्यात आला आहे.
संग्रहालयाच्या शतक वर्षपूर्तीचे औचित्य साधून 2020 या संपूर्ण वर्षांमध्ये विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम 'राजा केळकर संग्रहालय पुणे स्ट्रेम महोत्सव' या अंतर्गत आयोजित करण्याचा संग्रहालयाचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची सुरुवात होत असतानाच केळकर संग्रहालयाला एक अनोखी भेट मिळाल्या आनंद व्यक्त केला जात आहे.