पुणे- डोळ्यांचे पारणे फेडणारा पंढरपुरजवळील वाखरी येथील पालखी रिंगण सोहळा नुतन मराठी शाळेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्ञानोबा माऊली, तुकारामांच्या अखंड जयघोषाने शाळेचे प्रांगण दुमदुमन गेले. टाळ-मृदुंग वाजवत हरी नामाच्या गजरात बालचमू तल्लीन झाले होते. दिंड्या आणि भगवे पताके हाती घेवून अश्वाच्या मागे धावत चिमुकल्यांनी पालखी रिंगण सोहळा साजरा केला.
आषाढी एकादशी : पुण्यातील नुतन मराठी शाळेत रंगला चिमुकल्यांचा पालखी रिंगण सोहळा - pandharpur
आजच्या पिढीला वारीचा अभूतपूर्व सोहळा, महाराष्ट्रातील संतांचे कार्य कळावे म्हणून पालखी रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिंड्या आणि भगवे पताके हाती घेवून अश्वाच्या मागे धावत चिमुकल्यांनी पालखी रिंगण सोहळा साजरा केला.
चैतन्यमय वातावरणात वरुण राजाच्या साक्षीने छोट्या वारकऱ्यांचा पालखी रिंगण सोहळा रंगला होता. बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे आषाढी एकादशीनिमित्त वाखरीचे पालखी रिंगण साकारण्यात आले. प्रभात टॉकीजसमोरील नू.म.वि. प्राथमिक शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या पिढीला वारीचा अभूतपूर्व सोहळा, महाराष्ट्रातील संतांचे कार्य कळावे म्हणून पालखी रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखीसोहळ्यात सहभागी होणारे वारकरी कोण? ते वारीमध्ये का सहभागी होतात? हे विद्यार्थ्यांना समजावे म्हणून पालखी रिंगण सोहळा शाळेत साजरा करण्यात आला.