महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक, असा रंगणार आळंदी-पंढरी वारी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पंढरपूर वारीचे संपूर्ण वेळापत्रक समोर आले आहे. 2 जुलैला माऊली आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. 19 जुलै रोजी पालखी पंढरपूरकडे एसटी बसमधून रवाना होणार आहे. 2 ते 24 जुलै या काळात वारी होणार आहे. वाचा संपूर्ण वेळापत्रक...

mauli
mauli

By

Published : Jun 28, 2021, 8:08 PM IST

आळंदी (पुणे) -आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2 जुलैला सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून केली जात आहे. पालखी सोहळ्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार पार पडणार आहे. त्यानुसार माऊलींच्या चलपादुका विशेष वाहनाने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. 2 ते 24 जुलै या काळात वारी होणार आहे.

असे असेल पालखी सोहळ्याचे वेळापत्रक -

प्रस्थान सोहळा - २ जुलै.

- पहाटे ४ ते ५.३० : घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती.
- सकाळी ९ ते ११ : वीणा मंडपात कीर्तन
- दुपारी १२ ते १२.३० : गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व महानैवेद्य.
- सायंकाळी ४ वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ.

- सायंकाळी ६ वाजता माऊलींची पालखी मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी.

- ३ ते १९ जुलै : आजोळघरी माऊलींच्या पादुकांवर परंपरेनुसार सर्व नैमित्तिक उपचार.

- १९ जुलै : माऊलींच्या चलपादुका सकाळी १० वाजता एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार.

- १९ ते २४ जुलै : माऊलींच्या पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी.

- २४ जुलै : पौर्णिमेला काला समाप्तीनंतर पंढरपूरहून आळंदीकडे एसटी बसने परतीचा प्रवास.

हेही वाचा -संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

ABOUT THE AUTHOR

...view details