पुणे - भिमाशंकर परिसरात गेल्या ८ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भिमा नदीने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भिमेच्या पुराचे पाणी पाभे गावात शिरले आहे. मात्र, अद्यापही गावकऱ्यांना प्रशासनाकडून कुठलीच मदत मिळाली नाही.
भिमाशंकरमध्ये मुसळधार पाऊस; दोन दिवसांपासून पाभे गाव भिमेच्या पुराखाली - पाभे गाव पुणे
गेल्या ८ दिवसांपासून भोरगिरी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भिमा नदीला पूर आला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचे पाणी गावात शिरले आहे. या गावातील १०० कुटूंब तसेच पाळीव जनावरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नदीवरून पाभे गावाला जाण्यासाठी पूल आणि त्यासोबतच बंधारा बांधण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या बंधाऱ्यात पाणी साठवले जाते. पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याची सर्व दरवाजे उघडून पाणी सोडले जाते. मात्र, यंदा फक्त वरच्या दोन झडप उघडण्यात आल्या. तर खालच्या दोन झडप तशाच ठेवल्या होत्या. त्यामुळे बंधाऱ्यात पूर्वीचा ५ फूट पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या ८ दिवसांपासून भोरगिरी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भिमा नदीला पूर आला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचे पाणी गावात शिरले आहे. या गावातील १०० कुटूंब तसेच पाळी जनावरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामस्थ मदतीसाठी मागणी करीत आहेत. मात्र, प्रशासनाने अद्याप कुठलीही मदत दिलेली नाही.