महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खेड तालुक्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा - खेडमध्ये कोरोना रुग्ण वाढले

खेड तालुक्यात कोरोना परिस्थिती गंभीर आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असून, खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा जाणव असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाईंकाना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यास सांगितले जात आहे.

खेड तालुक्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
खेड तालुक्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

By

Published : Apr 20, 2021, 7:11 PM IST

पुणे - खेड तालुक्यात कोरोना परिस्थिती गंभीर आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असून, खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा जाणव असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाईंकाना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यास सांगितले जात आहे.

खेड तालुक्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली

कोरोनाबाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासू लागल्याने रुग्णांचे नातेवाईक हातबल झाले आहेत. एका रुग्णाला दिवसाला कमीत कमी 7 ते 8 किलो ऑक्सिजनची आवश्यकता असते, तर व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णाला एका तासाला एक किलो ऑक्सिजनची आवश्यकता असते. मात्र तालुक्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा -रेमडेसिवीरवरून राजकारण तापले! भाजप-महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

ABOUT THE AUTHOR

...view details