महाराष्ट्र

maharashtra

गंभीर... खेड तालुक्यात कोरोनाग्रस्तांना मिळेना ऑक्सिजन बेड

By

Published : Jul 29, 2020, 7:08 AM IST

खेड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे
पुणे

राजगुरुनगर (पुणे) - खेड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण, राजगुरुनगर, चांडोली येथे कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. मात्र, या सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांची फरपट होत आहे.

खेड तालुक्यात 1हजार 118 कोरोनाबाधित असून 660 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 439 रुग्णांवर चाकण येथील कोविड सेंटर, शहरातील खाजगी रुग्णालय आणि चांडोली येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, या सर्व रुग्णांलयातील ऑक्सिजन बेड फुल झाले आहे. त्यामुळे राजगुरुनगर येथील काही रुग्णांना मध्यरात्री खाजगी रुग्णालयात जाण्यासाठी डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.

जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून चाकण येथील तीन कोविड रुग्णालय चालवली जात आहेत. या रुग्णालयामध्ये पैशाची मागणी केली जात असल्याने, उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details