पुणे : आचार्य रजनीश ओशो यांचा काल (21 मार्च) 70 वा संबोधी दिवस होता. या पार्श्वभूमीवर जगभरातून अडीच ते तीन हजार ओशो शिष्य हे कोरेगाव पार्क येथील आश्रम परिसरात दाखल झाले आहेत. यावेळी आश्रम प्रशासनकडून जो ओशो भक्त माळ घालून येईल त्याला प्रवेश बंदी होती. दरम्यान, काल ते स्थगित करून भक्तांना आत माळ घालून सोडण्यात आले होते. पण आज सकाळी पुन्हा एकदा ओशो प्रशासक हे आक्रमक होत भक्तांना माळ घालून जण्यास विरोध करण्यात आला. यामुळे ओशो भक्त आक्रमक झाले. यावरून पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप ओशो भक्तांनी केला आहे.
आश्रमात जाण्यास नकार :आचार्य रजनीश ओशो यांच्या 70 व्या संबोधी दिवसानिमित्त आश्रमातील ओशोंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक हे पुण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ओशो भक्त आणि ओशो प्रशासन यांच्यात मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू असून भक्तांना माळा घालून आतमध्ये आश्रमात प्रवेश दिला जात नाही. पण काल मोठ्या प्रमाणावर भक्त पुण्यात आल्याने त्यांना माळा घातली असताना देखील सोडण्यात आले होते. पण आज या भक्तांना माळ घालून आतमध्ये प्रवेश देण्यात आल नाही. आणि पोलिसांना बोलवून या भक्तांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच यावेळी या आक्रमक भक्तांकडून आश्रमाच्या बाहेर गाणी, भजन, कीर्तन करून आंदोलन करण्यात आले आहे.