महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोणावळ्यात प्रदूषण वाढू नये यासाठी 'सायकल डे'चे आयोजन; सुनील शेट्टी यांच्या हस्ते उदघाटन - Inauguration by Sunil Shetty

लोणावळ्यातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सायकल डेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेता सुनिल शेट्टी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि स्वस्त भारतचा नारा दिला आहे तो नागरिकांनी अंगिकारला पाहिजे असे सांगितले.

Sunil Shetty
सुनील शेट्टी

By

Published : Jan 12, 2021, 12:29 PM IST

Updated : Jan 12, 2021, 12:42 PM IST

पुणे - लोणावळा शहरात आणि परिसरात प्रदूषण वाढू नये यासाठी 'सायकल डे'चे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हिंदी सिनेअभिनेता सुनील शेट्टी याच्या हस्ते उदघाटन पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि स्वस्त भारतचा नारा दिला आहे तो नागरिकांनी अंगिकारला पाहिजे, असे अभिनेता सुनील शेट्टी म्हणाला आहे.

लोणावळ्यात पर्यटकांचा वाढत वेग, वाहन यामुळे प्रदूषण वाढण्याची शक्यता!

लोणावळा हे पर्यटनस्थळ असून अवघ्या महाराष्ट्रासह देशात प्रसिद्ध आहे. लोणावळ्याकडे पर्यटकांचा वाढता वेग आणि वाहतूक बघता शहरात आणि परिसरात प्रदूषण वाढू नये यासाठी आज 'सायकल डे'चे आयोजन करण्यात आलं होतं. ते अविरत पणे सुरू ठेवणार आहेत.

लोणावळ्यात आठवड्यातून एकदा नागरिक चालवणार सायकल

लोणावळ्यात प्रदूषण वाढू नये यासाठी सायकल डे च आयोजन

लोणावळ्यात आठवड्यातून एकदा सायकल वापरावी असे आवाहन नगर परिषदे कडून करण्यात आले आहे. यावेळी 'सायकल डे'ला सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज केवळ सायकल डे च्या निमित्ताने जनजागृती केली असल्याचे नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुरेख जाधव यांनी केले आहे.

लोणावळा स्वच्छ आणि सुंदर ठेवा....

लोणावळ्यात सायकल डे च आयोजन

यावेळी अभिनेता सुनील शेट्टी म्हणाला की, मी गेली काही वर्षे झालं लोणावळ्यात वास्तव्यास आहे. शहरात 'सायकल डे'ला सुरुवात करून येथील स्थानिक प्रशासनाने चांगलं काम केलं आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत स्वस्त भारत चा नारा दिला आहे. तो आपण सर्वांनी जोपासला पाहिजे त्यांची दररोज जीवनात प्रत्येक्षात उतरवलं पाहिजे असे त्याने म्हटले आहे.

हेही वाचा - LIVE : सीरमच्या कोविशिल्ड लसीचे वितरण सुरू, वाचा प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट

Last Updated : Jan 12, 2021, 12:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details