पुणे (पिंपरी चिंचवड)-कोरोना काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींचा आपण सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'आशा वर्कर' यांच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.
कोरोना काळात कर्तव्य बजाणारे देवदूत
कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, भाजी विक्रेता शेतकरी, दूधवाला हे आपल्यासाठी देवदूत होते. त्यांनी केलेले कार्य अनमोल आहे. या काळात कर्तव्य बजावणाऱ्या अनेकांचा या महामारीत बळी गेला. त्यांच्या कुटुंबाची झालेली ही हाणी पैशाने भरून निघणार नाही. सरकार त्यांना मदत करेलच. पण आपण सर्वांनीही अशा कोरोना योद्धांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे
कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती-
राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शहराध्यक्ष संजोग वाघिरे, माजी महापौर अपर्णा डोके, डॉ. वैशाली घोडेकर, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेविका संगिता ताम्हाणे तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.