पुण्यात आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे आयोजन पुणे :रायटिंग वंडर्स'तर्फे पुण्यातील हॉटेल जें. डब्ल्यू मेरीएट येथे दोन दिवसीय आंतराष्ट्रीय फाउंटन पेन फेस्टीव्हल'चे ( International Fountain Pen Festival ) आयोजन ( Organized International Pen Festival in Pune ) करण्यात आले आहे. या फेस्टीव्हलमध्ये 75 ब्रँड असून तब्बल 2 हजारहून अधिक पेन फेस्टिवलमध्ये नागरिकांना बघायाला मिळणार आहे.तसेच 200 रुपयांपासून ते 5 लाख रु किंमतीचे पेन ( 5 lakh pen discussion among Punekars ) या मोहत्सवात उपलब्ध आहे. या फेस्टीव्हलला पुणेकरांचा उस्पुर्त असा प्रतिसाद मिळत असून 5 लाखाच्या पेनाची विक्रि झाली आहे.
पेन खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी फेस्टीव्हल चे यंदा 6 वे वर्ष - पुण्यातील पेन'च्या चाहत्यांना जगभरातील उच्च प्रतीचे पेन पाहता यावे यासाठी गेली ६ वर्षे आम्ही या फेस्टीव्हल'चे आयोजन करत आहोत. यंदा फेस्टीव्हलमध्ये लॅमी, पायलट, ऑरोरा, अरिस्ता, क्रॉस, बीना, कोंक्लीन, डिप्लोमट, क्लिक, पार्कर, पु.ल. . देशपांडे सिग्नेचर पेन, खास लहान मुलांसाठी 'चिंटू' पेन अशा विविध ब्रँड' चे फाउंटन पेन त्याचबरोबर रोलर पेन, मॅकेनाइज्ड पेन्सिल्स पहायला मिळत आहे. फेस्टिवलमध्ये देशभरातील विविध ठिकाणाहून लोकांनी येत तब्बल 2 हजार विविध वैशिष्ट्य असलेले पेन मोहत्सवात आहेत. महोत्सवात पेनाच्या चाहत्यांना जगभरातील तब्बल 75 हून अधिक ब्रँड’चे विविध प्रकारातील ‘प्रीमयम’ पेन पाहता येणार आहेत.
मोहत्सवात विविध प्रकारचे पेन पाहण्याची संधी डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम सिग्नेचर फाउंटन पेन’चे अनावरण -माजी राष्ट्रपती भारतरत्न ‘डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम सिग्नेचर फाउंटन पेन’चे अनावरण या फेस्टीव्हलमध्ये करण्यात आले. या पेनचे वैशिष्ट्य म्हणजे या पेनाच्या टोपणावर भारतरत्न डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांची अधिकृत स्वाक्षरी कोरलेली आहे. तसेच त्यांचे देशाप्रती असलेले प्रेम लक्षात घेत, पेन’च्या नीबवर ‘आय लव्ह इंडिया’ असे लिहिण्यात आले आहे. वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या या पेनवरील स्वाक्षरीबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक पेन’ला एक क्रमांक देण्यात आला आहे.
200 रु. पासून ते 5 लाखापर्यंत पेनची किंमत पाच लाख रुपये किमतीचा ‘मोन्टेग्राप्पा बॅटमॅन एडिशन’ हा प्रीमियम पेन -या पेन महोत्सवात तब्बल पाच लाख रुपये किमतीचा ‘मोन्टेग्राप्पा बॅटमॅन एडिशन’ हा प्रीमियम पेन पाहण्याची संधी पेन चाहत्यांना मिळणार आहे. या पेनचे वैशिष्ट्य म्हणजे टीटानियम धातूपासून हा पेन बनविण्यात आला असून, याला सोन्याची नीब बसविण्यात आली आहे. बॅटमॅन या लोकप्रिय भूमिकेतूपासून प्रेरित होत, या पेनाचे डिझाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्टेक्स कंपनीतर्फे तयार करण्यात आलेला मुघल कला, वास्तुशास्त्रावर आधारित ‘ अष्टकोन’ हा २२ कॅरट सोन्याचा मुलामा असलेला पेन, शाई बॉटल देखील महोत्सवात पाहता येणार आहे.
फेस्टीव्हलमध्ये 75 ब्रँडचे पेन उपलब्ध महोत्सवात मराठी स्वाक्षरी -महोत्सवात मराठी स्वाक्षरी कलाकार गोपाळ वाकोडे यांनी मराठीतून चार वेगवेगळ्या प्रकारात स्वाक्षरी’चे प्रात्यक्षिक दाखवत अनेकांचे लक्ष वेधले. मूळचे बुलाढाणा येथील वाकोडे हे शालेय शिक्षक असून, लेखनाची त्यांना विशेष आवड आहे. लोकांना मराठीतून स्वाक्षरी करण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने, गेली १८ वर्षे ते ‘मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी’ हा उपक्रम राबवित असून, आतापर्यंत त्यांनी ४ लाखहून अधिक लोकांना मराठी स्वाक्षरी शिकविली आहे. यापूर्वी जवळपास १५ वर्षे ते दिवाळी, उन्हाळ्यातील सुट्टी अशा वेळी पुण्यात येत असत. ते बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बसून, लोकांना मराठीतून स्वाक्षरी करून देत असत. त्यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना देखील मराठीतून स्वाक्षरी करण्याबाबत प्रशिक्षण दिले आहे. मराठी भाषेच्या प्रचारातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना राज्य सरकारतर्फे विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत मराठी स्वाक्षरी’चे १५ फॉरमट विकसित केले आहे.
लेखन साहित्यांचे प्रदर्शन -महोत्सवात सिंबायोसिस महाविद्यालयाच्या डिजाइन विभागाचे प्रमुख मनोहर देसाई यांनी संकलित केलेल्या जुन्या, दुर्मिळ लेखन साहित्यांचे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले आहे. यामध्ये पितळ, तांब्यापासून बनवलेली हत्ती, ससे यांसारख्या प्राण्यांच्या आकारातील जुनी शाईची भांडी, ताम्रपट, हस्तलिखिते, बोरू, जुने पेन, मोरपीस, शाई शोषून घेण्याचे उपकरण अशा विविध लेखन साहित्यांचा समावेश होता. यातील काही वस्तू या 200 वर्षांपेक्षा जुन्या असून, त्या राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमधून संकलित करण्यात आल्या आहेत.