महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष; तीन पक्षांना मिळून यश मिळवता आलं नाही - फडणवीस - ग्रामपंचायत निवडणूक निकाल न्यूज

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'हे तीन पक्ष आहेत. यांना बसायला जागा नाहीय. दोन कोच ठेवले आहेत. एका कोचवर तीन लोक बसायचे आहेत आणि एका कोचवर आपण एकटे आहोत. त्यामुळे आपल्याला बसायला भरपूर जागा आहे. दोन लोक बसायला जागा नाही, त्या ठिकाणी तिघे जण बसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्यासाठी भरपूर जागा तयार होत आहे. मोठ्या प्रमाणावर राजकीय स्पेस मिळत आहे.'

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस न्यूज
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस न्यूज

By

Published : Jan 22, 2021, 6:36 PM IST

पुणे - महाराष्ट्र राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले असून भारतीय जनता पक्ष हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष झाला आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी अनुसूचित जनजमाती मोर्चाला संबोधित करत होते. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी, ते अनेक मुद्द्यांवर बोलले असून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष - फडणवीस
आमच्या सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत

फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये चांगले निर्णय घेतले गेले आहेत. ते निर्णय बंद करणारे तुम्ही कोण होता, असा सवाल त्यांनी केला आहे. आदिवासींचा हक्क त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आवश्यकता पडली तर ते ही करू, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा -हिंदू संस्कृतीची टिंगलटवाळी खपवून घेणार नाही - हिंदू राष्ट्र सेना


दोन लोक बसायची जागा नाही, त्या ठिकाणी तिघे बसण्याचा प्रयत्न करताहेत

पुढे ते म्हणाले की, तीन पक्षांचे सरकार राज्यात आले आहे. तिन्ही तीन दिशेने चालले आहेत. सरकार आणि राज्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. पण आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही. हे तीन पक्षाचे सरकार आले, काहींना वाटायचे भाजपचे काय होईल. मी सांगितले होते की, एखाद-दोन निवडणुका इकडे-तिकडे झाल्या तरी काळजी करू नका. हे तीन पक्ष आहेत. यांना बसायला जागा नाहीय. दोन कोच ठेवले आहेत. एका कोचवर तीन लोक बसायचे आहेत आणि एका कोचवर आपण एकटे आहोत. त्यामुळे आपल्याला बसायला भरपूर जागा आहे. दोन लोक बसायला जागा नाही, त्या ठिकाणी तिघे जण बसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्यासाठी भरपूर जागा तयार होत आहे. मोठ्या प्रमाणावर राजकीय स्पेस मिळत आहे.

ग्रामपंचायतीमध्ये भाजप सर्वात पुढे आहे

त्याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत आला. ग्रामपंचायत निवडणुकीत साडेपाच-सहा हजार ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्ष निवडून आला आहे. तिघांना मिळवून देखील एवढ्या ग्रामपंचायत निवडून येऊ शकल्या नाहीत. आता खोटा आरोप करत आहेत. ग्रामपंचायतिमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष झाला आहे.

अण्णा हजारे यांचे आंदोलन होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहोत

तसेच, अण्णा हजारे यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. विखे पाटील आहेत, गिरीश महाजन आहेत. हे सर्व त्यांच्याशी चर्चा करत आहेत. केंद्रसरकारच्या वतीने त्यांच्याशी नीट चर्चा करून आंदोलन होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. तर, रेणू शर्मा प्रकरणी धंनजय मुंडे यांची पोलिसांनी नीट चौकशी करून सत्य समोर आणलं पाहिजे अस देखील त्यांनी म्हटलंय. शिवाय भरती थांबवणे योग्य नाही. मराठा समाजाला सुरक्षित करून कशी नोकर भरती करता येईल यावर विचार करायला हवा अस देखील त्यांनी मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा -ग्रामपंचायत निकालाचा जल्लोष; कुठे महाविकास आघाडी तर कुठे भाजपची सत्ता

ABOUT THE AUTHOR

...view details