पुणे- कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. उद्धव ठाकरेंनीही मोदींशी बोलावे पण वस्तुस्थिती समजून निर्णय घ्यावा. शरद पवारांसोबत आमचे कितीही वैचारिक मतभेद असले तरीही एक गोष्ट निश्चित सांगतो, ते जेव्हा हा अहवाल वाचतील तेव्हा ते प्रॅक्टिकल निर्णय घेतील. ते याबाबत कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
...त्यावर शरद पवार कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत - देवेंद्र फडणवीस - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुणे
कांजूरमार्ग कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील, त्यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मलिक यांनी दिली होती. यावर विचारले असता देवेंद्र फडणवीस त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
अधिकचे पैसे नंतर मेट्रोच्या तिकीटातूनच वसूल होणार
मेट्रोसोबत आमच्या भावना जुळलेल्या आहेत. मी स्वतः मेहनत करून, अडचणींवर मात करून टनेलचे 80 टक्के काम पूर्ण केले आहे. दुःख याचे आहे की, जी मेट्रो अडचणीवर मात करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 2021 साली सुरू होऊ शकते, ती 2024 पर्यंत का पुढे न्यायची? त्यासाठी जास्तीचे पैसे का द्यायचे? हे अधिकचे पैसे नंतर मेट्रोच्या तिकीटातूनच वसूल केले जातील.
तर मेट्रो पूर्ण कशी होणार?
बीकेसीची जागा 'प्राईस लँड' आहे. बीकेसीच्या जागेचा शेवटचा लिलाव हा 1800 कोटी प्रत्येकी हेक्टर इतका होता. मेट्रोच्या कारशेडसाठी 25 हेक्टर जागा लागते. मेट्रोची किंमतच वीस हजार कोटी आहे. डेपोसाठी 500 कोटी लागतात. त्यामुळे कारशेडच्या जागेसाठी पंचवीस ते तीस हजार कोटी खर्च केले तर मेट्रो पूर्ण कशी होणार? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.