महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar Clarification: पित्ताचा त्रास झाल्याने कार्यक्रम केला रद्द; नॉट रिचेबलच्या चर्चांनी वाईट वाटले, अजित पवारांचे स्पष्टीकरण - पित्ताचा त्रास झाल्याने कालचे सर्व दौरे रद्द

पित्ताचा त्रास झाल्याने कालचे सर्व दौरे रद्द केले, असे स्पष्टीकरण विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नॉट रीचेबल असल्याच्या चर्चांवर दिले आहे. मात्र आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अजित पवार यांच्याहस्ते पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या शोरुमचे उद्घाटन झाले.

Opposition leader Ajit Pawar Clarification
अजित पवारांचे स्पष्टीकरण

By

Published : Apr 8, 2023, 12:06 PM IST

Updated : Apr 8, 2023, 1:00 PM IST

पित्ताचा त्रास झाल्याने कार्यक्रम केला रद्द

पुणे: काल दुपारपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार हे नॉट रीचेबल असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच ते 7 आमदारांबरोबर नॉट रीचेबल असल्याचे सांगितले जाते होते.पण आज सकाळपासून पवार हे नियोजित त्यांच्या नियोजित कार्यक्रमात पाहायला मिळाले आहेत. शुक्रवारी अचानक रद्द करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी देखील माणूस आहे. मला काल कार्यक्रमाला निघालो असताना पित्ताचा त्रास झाला. कारण दौरे करून जागरण हे जास्त झाले की, मला त्रास होतो. काल मला कसे तरी झाल्यावर मी डॉक्टरांकडून गोळ्या घेतल्या आणि शांतपणे झोपलो. तर सकाळपासून कार्यक्रम सुरू केले. म्हणून मी कालचे दौरे रद्द केले असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.



चर्चा पहिल्यावर वाईट वाटले: आज सकाळी खराडी येथे फत्तेचंद रांका यांच्या ज्वेलर्सचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. यामुळे कालपासून सुरू असलेल्या चर्चा या अफवा असल्याचे पाहायला मिळत आहे. कालपासून सुरू झालेल्या चर्चेवर अजित पवार म्हणाले की, चर्चा पहिल्यावर मला इतकं वाईट वाटत होत की, मीडिया काहीही दाखवत होती की, दादा नॉट रीचेबाल हे चुकीचे आहे. आधी कन्फर्म करा आणि मगच बोलले पाहिजे. कारण नसताना एखाद्याची बदनामी करायची हे चुकीचे आहे.



मुलाखतीत मांडलेल्या भूमिकेबाबत अजित पवार: काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडलेल्या भूमिकेबाबत अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले की शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी भूमिका मांडल्यानंतर आम्ही काही भूमिका मांडणे योग्य नाही. त्यांनी मांडलेली भूमिका ही पक्षाची भूमिका आहे, असे यावेळी पवार म्हणाले.

हेही वाचा: Ajit Pawar Not Reachable नॉट रिचेबल झालेले अजित पवार आले समोर दौरे रद्द करण्यावर म्हणाले मी तर

Last Updated : Apr 8, 2023, 1:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details