महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छत्रपती शिवरायांना जाती-पातीत, जन्मस्थळांमध्ये अडकवू नका - प्रवीण दरेकर - छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ

कर्नाटक येथील मंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे आहे. थोर पुरुषांना जाती पातीत, जन्मस्थळात अडकवून ठेवता कामा नये. छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रातील शिवनेरी येथे झाला हे अख्ख्या जगाला माहीत आहे. मात्र, असे विधान करून थोर पुरुषांच्या बाबतीत वाद निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

By

Published : Feb 2, 2021, 3:30 AM IST

Updated : Feb 2, 2021, 4:01 AM IST

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांना जाती पातीत आणि जन्मस्थळांमध्ये अडकवू नका, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा महाराष्ट्रातील शिवनेरी येथे झाला आहे, हे अवघ्या जगाला माहीत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज हे कर्नाटक येथील असल्याचे विधान हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. ते, लोणावळा येथे शिवक्रांती कामगार संघटनेने आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, शिवक्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय पाळेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

धानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
कर्नाटक मंत्र्यांनी केलेले ते विधान चुकीचेदरेकर म्हणाले की, कर्नाटक येथील मंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे आहे. थोर पुरुषांना जाती पातीत, जन्मस्थळात अडकवून ठेवता कामा नये. छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रातील शिवनेरी येथे झाला हे अख्ख्या जगाला माहीत आहे. मात्र, असे विधान करून थोर पुरुषांच्या बाबतीत वाद निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. डॉ. लहानेंना उणे-दुणे काढणे शोभत नाही..डॉ. तात्याराव लहाने यांनी गेल्या सरकारच्या काळात त्यांना फार त्रासाला सामारे जावे लागले असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावर लहाने यांना तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस किंवा त्यांच्या सरकारकडून त्रास झाला नाही, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्यांना त्रास झाला असेल तर, तो माहीत नाही. परंतु, तात्यासाहेब लहाने यांच्यासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारे सार्वजनिक व्यासपीठावरून राजकीय पुढारी, सत्ता यांच्यातील उणी दुणी काढणे शोभा देत नाही. तात्यासाहेब लहाने यांना पद्मश्री पुरस्कारासाठी देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला होता, असेही दरेकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले. पोलीस आपलं संरक्षण करतात तेच आज असुरक्षित-पोलीस आपले संरक्षण करतात. तेच आज असुरक्षित आहेत. रोज पोलिसांवर हल्ले होत आहेत. कोरोना काळात जमावाने पोलिसांवर हल्ला केला होता. तेव्हा, पोलीस ठाण्यात जाऊन उपोषण केले होते. पोलिसांवर हल्ले होत असल्याने आता सरकारलाच पोलिसांची काळजी घ्या? अशी म्हणण्याची वेळ आली असल्याचा टोला त्यांना महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
Last Updated : Feb 2, 2021, 4:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details