पुणे -छत्रपती संभाजी महाराजांचा ३४१ वा राज्याभिषेक, शंभुराज्याभिषेक सोहोळा शौर्यपीठ तुळापूर येथे आज साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य शंभुभक्तांसह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्राजक्ता गायकवाड उपस्थीत होत्या.
माहिती देताना मंत्री छगन भुजबळ हेही वाचा -पुणे : प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाला सुरुवात
शंभू राजांचा खरा इतिहास जनतेसमोर आणणार...
महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावर शोधमोहीम घेऊन तीन दिवसात शिवाजी महाराजांची समाधी शोधली. त्या ठिकाणी फुले वाहिली होती. मात्र, त्यावेळी महात्मा फुलेंना विरोध केला गेला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर येऊ नये यासाठी समाजातील काही घटकांनी यापूर्वी असंख्य प्रयत्न केला आहे. ज्यांच्या हातात लेखणी होती त्यांनीच इतिहास मिटवण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप भुजबळ यांनी केला.
शंभुसृष्टी उभारणार...
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळी शंभुराजांच्या शौर्याची शंभुसृष्टी उभारण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार आहे. वढू व तुळापूर येथे प्रत्येक वेळी मोठा शंभुराज्याभिषेक सोहोळा, बलिदान दिवस साजरा करून त्यांच्या शौर्याचा खरा इतिहास जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच, आज राज्यभरात लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी नाशिकला जायचे आहे. त्याआधी शंभुराजांना वंदन करून पुढे गेल्यावर कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वीरित्या जिंकणार असल्याचे भुजबळ म्हणाले.
हेही वाचा -राजस्थानमधून पुण्यात तस्करी करून आणलेले 17 किलो अफू जप्त