पुणे- जुन्नर विधानसभा मतदार संघातील मनसेचे आमदार शरद सोनवनणे आता शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. मनसेचा एकमेव शिलेदार शिवसेनेच्या गळाला लागल्याने मनसेला राजकीय धक्का बसला आहे. रविवारी दुपारी २ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोनवणे शिवसेना भवनात पक्ष प्रवेश करणार आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत उमेदवारी नाकारल्याने सोनवणे यांनी मनसेत प्रवेश केला होता. तीन दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यक्तिशः भेट घेऊन सोनवणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यासोबतच दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे.