पुणे : सध्या आजकाल सोशल मीडियाचा वापर हा वाढत चालला ( use of social media increasing ) आहे. याच सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेक फसवणुकीच्या घटना या सध्या घडताना पाहायला मिळत आहे.अशी एक सोशल मीडियावर फसवणुकीची घटना पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे.पोपटाची आवड असलेल्या एका व्यक्तीने दोन पोपटांची दोन लाख रुपयांना ऑनलाइन खरेदी ( Online purchase of two parrots for two lakh ) केली. त्यातील अॅडव्हान्स स्वरूपात त्याने एक लाख दिलेही. मात्र, त्याला आजतागायत पोपटच न मिळाल्याने त्याने वानवडी पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.
पोपटाची खरेदी पडली महागात ग्राहकाचा 'पोपट' केल्याचा प्रकार :त्यामुळे सायबर चोरट्यांनी ग्राहकाचा 'पोपट' केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अक्षय दिलीप देशमुख (28, रा. सत्यविहार सोसायटीच्या पाठीमागे, वानवडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला ( Online Shopping Fraud ) आहे.
पक्षिप्रेमी असल्याने आवड : फिर्यादी हे पक्षिप्रेमी असून त्यांना पोपटाची खूप आवड आहे.सोशल मीडिया चा वापर करत असताना अक्षय देशमुख हे पोपट पाहत असताना त्यांना एका संकेतस्थळावर मकाऊ जातीचे पोपट विक्री होत असल्याचे समजले. त्यांनी लगेच तेथे उपलब्ध असलेल्या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधला असता मोबाईलधारक व्यक्तीने त्यांना पोपटांचे फोटो पाठविले. ते पोपट फिर्यादी यांना खूप आवडले. त्या दोन पोपटांची किंमत दोन लाख रुपये ठरली. त्यांनी अॅडव्हान्स स्वरूपात सुरुवातीला ऑनलाइन माध्यमातून एक लाख रुपये पाठविले.
वर्ष होऊनही पोपट हाती नाहीच :या पोपटांच व्यवहार होऊन एक वर्ष होऊन ही अक्षय याला पोपट आले नाही. वारंवार फोन करून आज पोपट मिळतील, उद्या मिळतील, असे म्हणत मोबाईलधारक व्यक्तीने टाळाटाळ केली. अखेर कोणत्याही प्रकारे पोपट न मिळाल्याने अक्षय याने याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अशी माहिती वानवडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी दिली.