पुणे- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सर्व नागरिक कुटुंबीयांसह घरातच आहेत. या काळात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑनलाईन माहिती, ऑर्डर, ऑफिसचे कामकाज, बँकेचे व्यवहार केले जात आहेत. हिच संधी साधत काही भामटे ऑनलाईन फ्रॉड करत आहेत.
लॉकडाऊनचा परिणाम, 'ऑनलाईन फ्रॉड'च्या घटनांमध्ये वाढ - लॉकडाऊनचा परिणाम
इंटरनेटच्या माध्यमातून बिजनेस अकाऊंट लिंक पाठवली जाते. त्यानंतर ओटीपी मागवून अकाऊंट ताब्यात घेतले जाते. त्याचबरोबर आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना व्हाट्सअप मेसेज केले जातात. पैशाची अडचण आहे कृपया पैसे द्या. असे मेसेज पाठवले जातात.यासंदर्भात पुण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आलेत.
पुण्यात अशा पद्धतीने फ्रॉड झाल्याचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत सायबर विभागाच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे. इंटरनेटच्या माध्यमातून बिजनेस अकाऊंट लिंक पाठवली जाते. त्यानंतर ओटीपी मागवून अकाऊंट ताब्यात घेतले जाते. त्याचबरोबर आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना व्हाट्सअप मेसेज केले जातात. पैशाची अडचण आहे कृपया पैसे द्या. असे मेसेज पाठवले जातात.
यासंदर्भात पुण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊनदरम्यान आम्ही लोकांना मदत करत आहोत. या अकाऊंटवर पैसे पाठवा असेही मेसेज पाठवले जात आहेत. त्यामुळे संबंधितांनी शहानिशा आणि खात्री करूनच योग्य ठिकाणी मदत द्यावी. अन्यथा फसवणूक आणि मानसिक त्रास होईल, असे सह पोलीस आयुक्त रवींद्र सिसवे यांनी सांगितले.