पुणे- संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केले गेले आहे. यामुळे शाळा-कॉलेज, क्लासेस, सार्वजनिक ठिकाणे बंद आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा विचार करून बारामतीतील विनोद कुमार गुजर स्कूलमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे मुलांना घर बसल्या सर्व अभ्यासक्रम शिकवण्याचा उपक्रम सुरू केला गेला.
बारामती अग्रेसर : लॉकडाऊनदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण - corona cases in baramati
शैक्षणिक दृष्ट्या सजग असणाऱ्या बारामतीत लॉकडाऊनदरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना केली आहे. व्हिडीओ कॉलद्वारे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्यासाठी विनोद कुमार गुजर शाळाने पुढाकार घेतला आहे. अध्यापनादरम्यान विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास ती विचारण्याची सोय करण्यात आली आहे.
देशभरात विविध कारणांनी बारामतीला ओळखले जाते. तसेच पुण्यापाठोपाठ आता शैक्षणिक क्षेत्रातही बारामती अग्रेसर ठरत आहे. शैक्षणिकदृष्ट्या सजग असणाऱ्या बारामतीत लॉकडाऊन दरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना केली गेली आहे. व्हिडीओ कॉलद्वारे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्यासाठी विनोद कुमार गुजर शाळाने पुढाकार घेतला आहे.
अध्यापनादरम्यान विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास ती विचारण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच एखादा विद्यार्थी काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही. तरी त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अभ्यासक्रमाच्या प्रत्येक तासाचे व्हिडीओ चित्रिकरण लिंकद्वारे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत. त्यामुळे हा अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्याला पुन्हा शिकता येणार आहे. ही पालकांसाठीही दिलासादायक बाब आहे.