पुणे - आंबेगाव तालुक्यात चोरांनी कांदा चोरीचे सत्र सुरू केले आहे. अवसरी टाव्हरेवाडी येथील दत्तात्रय टाव्हरे यांच्या साठवणुकीतील दहा कांद्याची पोती चोरीला गेल्याची घटना घडली.
कांद्याचे बाजारभाव तेजीत असल्याने कांद्याची चोरी होत आहे
शुक्रवारी दिवसभरात 10 पोती कांदा भरून दत्तात्रय टाव्हरे सायंकाळी घरी गेले. शनिवारी व्यापारी कांदा खरेदीसाठी येणार होता. शनिवारी संध्याकाळी ते आपल्या कांदा चाळीमध्ये कांदा पाहण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना कांद्याच्या भरून ठेवलेल्या दहा पिशव्या गायब असल्याचे लक्षात आले.
हेही वाचा - दाटले हे धुके.. उत्तर पुणे भागाला पांढऱ्या शुभ्र धुक्याची मिठी !
गेल्या काही दिवसांपासून दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव तेजीत आल्याने साठवणुकीत ठेवलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी काढत आहेत. बाजार समितीमध्ये कांद्याला तीनशे ते साडेतीनशे दर मिळत आहेत. या कांद्यावर चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले असून कांद्याची चोरी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता घराची राखण करावी की कांदा चाळीची असा प्रश्न निर्माण झाला आहे.