महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तूर्कस्तानामधून आयात कांद्याचा वांदा.. बेचव असल्याने विक्रीविना तसाच पडून - News about the Chakan Market Committee

राज्यात कांद्याच्या बाजारभावाने उच्चांक गाठल्याने सरकारने तुर्कस्तान व इजिप्तमधून कांद्याची आयत सुरू केली. तूर्कस्तानातून आयात झालेला कांदा चाकण बाजारसमितीत पडून राहिला आहे. हा कांदा बेचव असल्यामुळे कांदा खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

onion-imported-from-turkey-is-not-on-sale
तुर्कस्तानातुन आयात केलेला कांदा बेचव; विक्रीविना पडुन

By

Published : Jan 18, 2020, 7:57 AM IST

Updated : Jan 18, 2020, 1:35 PM IST

पुणे - राज्यात कांद्याच्या बाजारभावाने उच्चांक गाठल्याने सरकारने तुर्कस्तान व इजिप्त मधून कांद्याची आयात सुरू केली. तूर्कस्तानातून आयात झालेला कांदा चाकण बाजार समितीत दाखल झाला. मात्र, हा तूर्कस्तानातून आलेला कांदा बेचव निघालाय त्यामुळे कांद्याने पुन्हा एकदा वांदे केलेत.

तुर्कस्तानातुन आयात केलेला कांदा बेचव; विक्रीविना पडुन

कांद्याच्या बाजारभावावर मात करण्यासाठी तुर्कस्तानातून कांद्याची आयात करण्यात आली. मात्र, हा कांदा चवीला चांगला नसल्याने या कांद्याची विक्री होत नसल्याने चाकण बाजार समितीत तूर्कस्तानातून आयात करण्यात आलेला कांदा पडून राहिला आहे. त्यामुळे शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

काही दिवसात कांद्याच्या तुटवड्यामुळे कांद्याने उच्चांकी भाव घाटल्याने रोजच्या जेवनात कांदा बेघर झाला होता. प्रत्येकाला स्वस्त दरात कांदा मिळावा म्हणून एक लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक कांदा तूर्कस्तान व इजिप्तमधून कांदा आयात करण्याचे धोरण शासनाने आखले होते. तूर्कस्तान पाठोपाठ इजिप्तचा कांदा चाकण बाजारात दाखल झाला आहे. मात्र, आयात केलेला कांदा व आपला कांद्यातील फरक पहावून तूर्कस्तानाच्या कांद्याची मागणी घटुन खरेदीदार मिळत नसल्याने 'तुर्कस्तानच्या कांद्याने व्यापाऱ्यांचा वांदा' केलाय

30 रुपये किलो दराने तूर्कस्तानातुन आयात केलेला कांदा चाकण बाजारात 15 रुपये प्रति किलोदराने देखील विक्री होत नाही. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावाने आजही उच्चांक गाठलाय. गावरान कांद्याच्या तुलनेत या तुर्कस्तानच्या कांद्याला अजिबात चव नसल्याचे ग्राहक या कांद्याला नकार देतात. मात्र, हॉटेल व्यवसायिक स्वस्तात मिळणाऱ्या कांद्याला पसंती देत आहेत. कांद्याच्या बाजारभावावर मात करण्यासाठी सरकारने कांदा आयातीचे धोरण राबवले मात्र हाच कांदा बेचव निघाल्याने शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Last Updated : Jan 18, 2020, 1:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details