पुणे - उत्तर पुणे जिल्हा दुष्काळाने होरपळत असताना आज खेड,आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली, मात्र या विजांच्या कडकडाटात शिरुर तालुक्यातील निर्वी गावात एका २१ वर्षीय तरुणाच्या अंगावर वीज पडुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय पवार असे त्या तरुणाचे नाव आहे.
पुण्यातील निर्वी गावात वीज पडून तरुणाचा मृत्यू - farmer
पुण्यात विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. यावेळी परिसरातील शिरुर तालुक्यातील निर्वी गावात एका २१ वर्षीय तरुणाच्या अंगावर वीज पडुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय पवार असे त्या तरूणाचे नाव आहे.
अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू
पावसाच्या प्रतीक्षेत खरीप हंगामाच्या तयारीची कामे सुरू असताना अक्षय शेतात काम करुन पावसाची सुरुवात झाल्यानंतर घराकडे निघाला असताना अचानक अंगावर वीज पडून अक्षयचा जागीच मृत्यू झाला. एकीकडे पावसाच्या सरी सुरु झाल्याचा आनंद बळीराज्याच्या चेहऱ्यावर पहायला मिळत असताना शिरुर तालुक्यात वीज पडल्याच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.