पुणे -एकमेकांकडे रागाने पाहिल्याच्या कारणावरून दोन भाडेकरूंमध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादातून एकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील खराबवाडीमध्ये घडली. विजय लक्ष्मण गायकवाड असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
चाकण खराबवाडीत किरकोळ वादातून एकाची कोयत्याने हल्ला करुन हत्या - Pune Police News
किरोकळ वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना खेड तालुक्यातील खराबवाडीमध्ये घडली.
पुण्यात किरकोळ वादातुन एकाची हत्या
चाकण जवळील खराबवाडी येथील भाडेकरू चाळीतील खोल्यांमध्ये विजय गायकवाड व मुकेश घोलप हे दोघे शेजारी रहायला होते. या दोघांमध्ये रविवारी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. याच वादातून मुकेश घोलप याने विजय यांच्यावर घरासमोरच कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विजय यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून मुकेश लक्ष्मण घोलप याच्यावर खुनाचा गुन्हा महाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.