पुणे -शिरुर तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये अनोखा उपक्रम राबवला जात आहे. या कोविड सेंटरमधून कोरोनाबधित रुग्ण बरा होऊन घरी परतताना त्याला ऑक्सिजन देणारे झाड दिले जाते. सद्या राज्यात ऑक्सिजनची कमतरता ओळखून प्रत्येक रुग्णाला घरी ऑक्सिजन मिळावा, यासाठी 'एक झाड भेट' हा उपक्रम या कोविड सेंटरतर्फे रावबण्यात येत आहे.
कोविड सेंटरतर्फे 'एक झाड भेट' उपक्रम -
शिरुर तालुक्याच्या पिंपळे जगताप येथे आमदार अशोक पवार व राव लक्ष्मी फांउडेशनच्या सौजन्याने २०० बेडचे सुसज्ज असे सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमसह दोन रुग्णवाहिका तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्री उभारण्यात आली आहे. मात्र, कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडताना ऑक्सिजनचे महत्त्व ओळखून प्रत्येकाला घरी जाताना एक झाड भेट दिले जात आहे. यामुळे प्रत्येक घरी जाणारा माणूस झाड लावेल आणि ऑक्सिजनची कमतरता भासणार नसल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - दिल्ली: लसीकरण होऊनही सर्जनचा मृत्यू; रुग्णालयातील ८० कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग