महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कमी पगार दिल्याच्या रागातून नोकराने मालकाच्याच घरी मारला डल्ला - thief arrested in pune

नामदेवने जयंती यांच्या घरातील आठ लाख रुपयांचा हिऱ्याचा हार आणि सोन्याचे सिक्के पळवले. तेव्हा जयंती यांनी नामदेवविरोधात सांगली पोलिसात फिर्याद दाखल केली. तेव्हा सांगवी पोलिसांनी आरोपी नामदेवला अटक केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

one thief arrested in pune
मालकाच्या जाचाला कंटाळून नोकराने मालकाच्याच घरी मारला डल्ला

By

Published : Mar 2, 2020, 5:31 AM IST

Updated : Mar 2, 2020, 6:35 AM IST

पुणे- मालकाच्या जाचाला कंटाळून तसेच कमी पगार दिल्याच्या रागातून नोकराने मालकाच्या घरातील आठ लाख रुपयांचा हिऱ्याचा हार आणि सोन्याचे सिक्के असा एकूण नऊ लाख रुपयांचा ऐवज पळवल्याची घटना सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नामदेव विठ्ठल चव्हाण असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामदेव विठ्ठल चव्हाण हा मागील तीन वर्षापासून फिर्यादी जयंती वासुदेव अय्यंगार यांच्या घरी कुक आणि घरातील इतर कामे करायचा. जयंती या कमी पगार तसेच त्रास देत असल्याने मी चोरीचे पाऊल उचलले असल्याचे आरोपीचे म्हणणे आहे.

आरोपी नामदेवसह सांगवी पोलीस...

नामदेवने जयंती यांच्या घरातील आठ लाख रुपयांचा हिऱ्याचा हार आणि सोन्याचे सिक्के पळवले. तेव्हा जयंती यांनी नामदेवविरोधात सांगवी पोलिसात फिर्याद दाखल केली. तेव्हा सांगवी पोलिसांनी आरोपी नामदेवला अटक केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

या पथकाने केली आरोपीला अटक -

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी दत्तात्रय गुळीग, यशवंत साळुंके, पोलीस उप निरीक्षक, सांगवी पोलीस ठाणे येथील तपास पथकातील कर्मचारी चंद्रकांत भिसे, रोहिदास बोहाडे, कैलास केंगले, सुरेश भोजणे, नितीन दांगडे, अरुण नरळे, नितीन खोपकर, शशिकांत देवकांत, विनायक देवकर, अनिल देवकर, हेमंत गुत्तीकोडा आणि शिमोन चांदेकर यांनी आरोपी नामदेवला अटक केली.

Last Updated : Mar 2, 2020, 6:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details