पिंपरी-चिंचवड (पुणे) - चिंचवड बिजलीनगर येथे विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली आहेत. तुषार ऊर्फ दाद्या रवींद्र खांगटे (32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस गस्त घालत असताना पोलीस जयवंत राऊत यांना एका तरुणाकडे विनापरवाना पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या पथकाने सापळा रचून तुषार ऊर्फ दाद्या रवींद्र खांगटे याला अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक - pune police
विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पिंपरी-चिंचवड येथील बिजलीनगर येथून अटक करण्यात आली.
पिंपरी-चिंचवडमध्ये विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक