पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजदेखील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून तिच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ८५ वर पोहोचला आहे. त्यामुळे, नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण; रुग्णांचा आकडा ८५ - corona case in pimpri
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशीमध्ये १९ वर्षीय तरुणीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शनिवारीदेखील मोशी आणि दिघी येथील दोन व्यक्तींला कोरोना झाला असून त्यांच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सलग एकाच परिसरातील नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने मोशी परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
![पिंपरी-चिंचवड शहरात १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण; रुग्णांचा आकडा ८५ पिंपरी-चिंचवड शहरात १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6948095-1047-6948095-1587893357127.jpg)
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशीमध्ये १९ वर्षीय तरुणीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शनिवारीदेखील मोशी आणि दिघी येथील दोन व्यक्तींला कोरोना झाला असून त्यांच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सलग एकाच परिसरातील नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने मोशी परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड शहराला सील करण्यात आले आहे.आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात ८५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील २४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर चार जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. यामध्ये एक रुग्ण शहराच्या बाहेरचा रहिवासी होता. आता ९ जणांवर पुण्यात उपचार सुरू आहेत.