पुणे -राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात आणखी एका रुग्णाचा कोरोनाच्या तपासणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १६ वर पोहोचली आहे. ही व्यक्ती पिंपरी चिंचवड भागातील रहिवासी असून ती जपानला जाऊन आली होती. ज्याची १४ मार्चला चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. तर, राज्यभरात कोरोणाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३२ झाली आहे.
राज्यात १३ मार्च २०२० पासून साथरोग अधिनियम कायदा १८९७ लागू करण्यात आला असून त्यानुसार या अधिनियमाच्या खंड २, ३ व ४ नुसार महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० ही अधिसूचना निर्गमित करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. तसेच, राज्यात साथरोग अधिनियमानुसार कोविड १९ उद्रेक प्रतिबंध व नियंत्रणासाठी आयुक्त, आरोग्य सेवा,संचालक आरोग्य सेवा, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त हे सक्षम अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.