पुणे- मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला सायबर सेलच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ६० हजार रुपये किंमत असलेले चोरीचे १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सदरचा गुन्हा भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल होता. त्याचा समांतर तपास सायबरसेलने केला आहे.
अल्पवयीन मोबाईल चोराच्या मुसक्या आवळल्या; 12 मोबाईल जप्त - Shrikrishna Panchal
मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला सायबर सेलच्या पथकाने जेरबंद केले आहे.
![अल्पवयीन मोबाईल चोराच्या मुसक्या आवळल्या; 12 मोबाईल जप्त](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3984280-11-3984280-1564438240868.jpg)
नितीन संजय कुरकुटे (वय २५ वर्षे) याचा आणि त्याचा मित्र विठ्ठल घोडके या दोघांचा जून महिन्यात रात्री मोबाईल फोन चोरीला गेले होते. त्याबाबत त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबर सेलचे पोलीस कर्मचारी नितेश बिच्चेवार आणि अतुल लोखंडे यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की, एक मुलगा चोरीचे मोबाईल फोन विकण्यासाठी जय गणेश साम्राज्य भोसरी येथे येणार आहे.
त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता आणखी ११ मोबाईल मिळून आले. हीची कारवाई सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे, पोलीस कर्मचारी अतुल लोखंडे, भास्कर भारती, नितेश बिच्चेवार, नाजुका हुलावळे, आशा सानप यांच्या पथकाने केली आहे.