महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौंडमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार - दौंडमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी (एम एच १६ ए एक्स ३२४८) एमआयडीसीमधून पाटस दिशेकडे जात असताना ट्रकला जाऊन धडकली. अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला हेंकल कंपनीच्या रुग्णवाहिकेने दौंड येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

ट्रक आणि दुचाकीचा अपघात ,दुचाकी स्वार ठार

By

Published : Nov 6, 2019, 7:43 PM IST

दौंड - कुरकुंभमधील औद्योगिक वसाहतीतील हेंकल कंपनीसमोर एक दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -तीस हजारी प्रकरण : केंद्रीय गृहमंत्रालयाची स्पष्टीकरण मागणारी याचिका रद्द

मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी (एम एच १६ ए एक्स ३२४८) एमआयडीसीमधून पाटस दिशेकडे जात असताना ट्रकला जाऊन धडकली. अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला हेंकल कंपनीच्या रुग्णवाहिकेने दौंड येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कुरकुंभ पोलीस ठाण्याचे हवालदार पंडित मांजरे, दत्तात्रय चांदणे यांनी घटनास्थळी पाहणी करून ट्रकचालकाला ताब्यात घेतले. मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव मात्र समजू शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details