पुणे-पुणे-नगर महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासुन अपघातांची मालिकाच सुरूच आहे. या अपघातांमध्ये निष्पापांचे बळी जात असून मंगळवारी रात्रीच्या सुमाराम शिक्रापूर येथील पाबळ चौकात लक्झरी बस, एस टी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या दुचाकीवरील पती-पत्नी पैकी पतीचा जागीच मृत्यु झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. संतोष निवृत्ती साठे (वय ३०) असे अपघातात मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. तर शितल संतोष साठे (वय २८) ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथे भीषण अपघात; दुचाकीवरील पतीचा मत्यू तर पत्नी गंभीर जखमी - शिक्रापूर
मंगळवारी रात्रीच्या सुमाराम शिक्रापूर येथील पाबळ चौकात लक्झरी बस, एस टी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या दुचाकीवरील पती-पत्नी पैकी पतीचा जागीच मृत्यु झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
पुणे-नगर रस्त्यावरुन शिक्रापूर येथे नगरवरुन पुण्याच्या दिशेने सणसवाडी येथील संतोष साठे हा त्याच्या पत्नीसह सणसवाडीकडे एमएच १२ पिडी २५१४ या दुचाकीहून जात होता. यावेळी शिक्रापूर पाबळ चौकातील रक्षक रुग्णालया समोर संतोषच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात लक्झरी बसचा धक्का लागला. त्यावेळेस संतोष आणि त्याची पत्नी दोघे दुचाकीहून खाली पडले त्याचक्षणी पाठीमागून आलेल्या एम एच २० बि एल २६३९ या एसटीचे पाठीमागील चाक संतोष च्या डोक्यावरुन गेले त्याचा जागीच मृत्यु झाला
दरम्यान, बाळु निवृत्ती साठे (वय २७ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात लक्झरी चालकावर गुन्हा दाखल केला.