महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंबेगाव तालुक्यात घराला आग; वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू - वृद्ध

मुक्ता भिवा गांजवे (वय ९५), ठकुबाई मुक्ता गांजवे (वय ६५) असे वृद्ध दाम्पत्याचे नावे आहेत.

आंबेगाव तालुक्यात घराला आग; वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

By

Published : May 3, 2019, 5:49 PM IST

पुणे- आंबेगाव तालुक्यातील वळती येथे वृद्ध दाम्पत्याच्या राहत्या घराला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घरात वृद्ध दाम्पत्य राहत होते. त्यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाला आहे. मुक्ता भिवा गांजवे (वय ९५), ठकुबाई मुक्ता गांजवे (वय ६५) असे वृद्ध दाम्पत्याचे नावे आहेत.

आंबेगाव तालुक्यात घराला आग; वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास वळती येथील गांजवेवाडी या वस्तीवर राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घराला अचानक आग लागली. यात दोघेही वृद्ध पती-पत्नी घरात झोपलेले असताना आग वाढत गेली. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या घटनेमध्ये वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. तर, वृद्ध व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथेच त्यांचाही मृत्यू झाला आहे.

अचानक लागलेल्या आगीमध्ये घरगुती साहित्य, अन्नधान्य, कपड्यांसह संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने घराला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

दरम्यान, सध्या उन्हाचा कडाका मोठा असून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये राहत्या घरांना आग लागल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून या आगीच्या घटना रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचीची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details