दौंड (पुणे) - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील चौफुल्यानजीक रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका वयोवृद्ध वारकऱ्यास भरधाव पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिली. या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. धडक देऊन वेगाने पळून जाणाऱ्या पिकअप चालकास यवत पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चौफुला येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रामभाऊ बाजीराव सांडभोर हे सोलापूरहून पुण्याच्या दिशेने साईड पट्टीवरून पायी चालत जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या पिकअप टेम्पोने त्यांना धडक दिली. या अपघातात रामभाऊ बाजीराव सांडभोर (वय 69, रा. जवुळके खुर्द, ता. खेड, जि पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला.
पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव पिकअप व्हॅनच्या धडकेत चौफुला येथे वारकरी ठार - पिकअप व्हॅनच्या धडकेत चौफुला येथे वारकरी ठार
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील चौफुल्यानजीक रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका वयोवृद्ध वारकऱ्यास भरधाव पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिली. या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
d
अपघात घडल्यानंतर पिकअप चालक पुणे-सोलापूर महामार्गावरील घटनास्थळी चौफुला येथून अत्यंत वेगाने पुण्याकडे जात असल्याचे यवत पोलीस स्टेशनचे हवालदार गणेश पोटे यांनी पाहिले. पोलीस हवालदार गणेश पोटे यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पिकअपचा चालक आरोपी संदीप साकेत (वय 24, रा. करमजी सीधी, मध्य प्रदेश) याला उरुळी कांचन येथे पकडले. सदर पिकअप व्हॅन यवत पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.