पुणे - भिमाशंकर - राजगुरुनगर महामार्गावर रविवारी दुपारी आखारवाडी चास येथे एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरील वरील एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरूणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अमित डोंगरे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा -Video: इंद्रायणी काठावर सोडले तीन दिवसांच्या चिमुकलीला; जन्मदात्री सीसीटीव्हीत कैद
भोरगिरी बोरीवली ही बस राजगुरुनगरच्या दिशेने येत असताना आखारवाडी चास येथील एका धोकादायक वळणावर बस आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा -दिवसा हॉटेलमध्ये वेटर तर रात्री दुचाकी चोर... अखेर पोलिसच ठरले शिरजोर!
राजगुरुनगर - भिमाशंकर महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांमुळे आणि धोकादायक वळणांवर फलक न लावल्याने अनेक अपघातांच्या घटना घडत आहेत. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन भिमाशंकर मार्गावरील अपघातांची मालिका वेळीच थांबवावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.