पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने थैमान घातलं असून आज (शनिवार) एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळला आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक जण कोरोना पॉजीटिव्ह; एकूण रुग्ण २७ तर १२ जणांना डिस्चार्ज
पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. आज आणखी एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. त्यामुळे बाधितांची संख्या २७ झाली असून १२ जणांना डिस्जचार्ज मिळाला आहे.
शहरात कोरोना पॉजीटिव्ह व्यक्तींची एकूण संख्या २७ झाली आहे. पैकी, १२ जणांना घरी सोडण्यात आले असून उर्वरित १५ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन चार दिवसांपासून पुन्हा कोरोनाने थैमान घातले आहे. शहरातील आकडा वाढत चालला आहे. आजदेखील एक व्यक्तीला कोरोना असल्याचं निष्पन्न झाले असून त्याचा अहवाल पॉजीटिव्ह आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांचा संख्या शहरात वाढण्याची चिन्हे आहेत. हे पाहता नागरिकांनी आपल्या घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे.